मी उडनछु Marathi Song |
Mi Udanchhoo Song Lyrics In Marathi
तो आणि समुद्र सारखेच आहेत
जसा समुद्राचा शेवट आपल्याला ठाऊक नसतो
अगदी तसचं त्याचं माझ्यावर एवढं प्रेम का आहे..
हे आज ही मला ठाऊक नाही...
लहानपणी दिलेलं Promise
ना त्याने विसरलंय.. ना मला विसरू दिलंय
सावली सारखा सोबत राहिला...
निस्वार्थी प्रेम केलं...
जेव्हा सगळं जग त्याला म्हणत होत..
ही तुला सुट होत नाहीय...
मॅच नाहीय तुमचा ...
हे ऐकून मला खूप राग यायचा...
पण तो हसून उत्तर द्यायचा......
भाई आपण Lucky है... म्हणून ती आपली हैं...
लव्ह माझं तूच तू
जीव माझा तूच तू
तुझासाठी क्रेझी
झालो ग...
हो गोडवाली स्माईल तू
बिऊटीफूल फ्लावर तू
तुझा मध्ये गुंतलोया ग
हो धड धड धडकणार
काळीज माझं तूच तू
श्वास असा वेगळा नि तू
हो...
अवचित अडकणार
भावना हि तूच तू
दिलाचा रोग माझा तू
तुझ्या पिरमात झालोया मी ग
उडन छू...
तुझ्या पिरमात झालोया मी ग
उडन छू...
तुझ्या पिरमात झालोया मी ग
उडन छू उडन छू...
परीक्षा मी दिली... पण पास तो झाला...
माझ्या प्रॅक्टिकल selction च लेटर येणार..
याची खात्री माझ्या पेक्षा जास्त त्यालाच होती...
हो गोल मोल माझी परी तू
तुझविणा जीव राहीना
दिसती मला ग जवा तू
मन थाऱ्याव राहीना..
हो तुझं ते रुसणं
हलूच हसणं
फील होत तुझं
ते रूप ग
कधी जीवापाड
कधी कधी थोडं
कळंना मला तुझा प्यार ग
तुला पाहताना जीव कसा सावरू
तुझी माझी लव्हस्टोरी झालिया सुरु
तुझ्या पिरमात झालोया मी ग
उडन छू...
तुझ्या पिरमात झालोया मी ग
उडन छू...
तुझ्या पिरमात झालोया मी ग
उडन छू उडन छू...
तुम्हाला वाटलं मी पायलेट झाले..पण थांबा...
Strugl अजून संपला नव्हता...
तरी पण तो सोबत होता...
स्वप्नाना आधार लागत नसला तरी...सोबत लागतेच..
म्हणून मी एक निर्णय घेतला होता
तुझं ते रूप न्यारं
भरलं मनामंदी
जिवलग माझा
तू सखा...
हळवा जीव माझा
गुंतला तुझ्यामंदी
काळज यो तूच चोरला
तुझीच मी माझा राहशील तू
मिठीत घे आता नको घाबरु
मधाळ प्रेमाचं गोडवा र तु
औंदान चल लगीन करू
तुझ्या पिरमात झालोया मी ग
उडन छू...
तुझ्या पिरमात झालोया मी ग
उडन छू...
तुझ्या पिरमात झालोया मी ग
उडन छू उडन छू...
माझ्या सोबत तो होता... अगदी तसचं प्रत्येक मुलीला एक हक्काची सोबत म्हणून मी Aviation कंपनी सुरू केली. मी स्वतः ला पारखत होते, पडत होते, रडत होते, तेव्हा माझ्या सोबत तो होता... त्याच्याच मुळे मी इथवर पोहचले. तो आज ही माझ्या सोबत आहे आणि कायम राहील. अस म्हणतात की देवळात कधीतरी दुसऱ्यांसाठी मागून बघा मग स्वतः साठी मागण्याची गरज लागणार नाही. स्वप्न मी बघत होते पण जगत तो होता.. आकाश जरी माझ असल तरी पंख त्याचे होते. हा प्रवास संपणार नाही, हा हाथ सुटणार नाही. प्रत्येक जन्मात माझाच राहशील तू, तुझ्याच प्रेमात होत राहीन मी उडन छू...
Mi Udanchhoo Marathi Song Credits
- Song : Mi Udanchhoo
- Singers : Javed Ali & Sonali Sonawane
- Music & Lyrics : Prashant Nakti
This song is sung by Prashant Nakti Song in 2022
- Audio Co-ordinator : Vijay Sonawane
- Flute : Dr. Himanshu Ginde
- Director : Sachin Kamble