This Kaku Rap Song is all about a woman supporting a woman. Kaku Rap Song Lyrics A woman has to support another woman and should not judge her by her clothes, makeup, friends, or anything else. This Kaku Rap Song In Marathi Lyrics rap is full of sarcasm, comedy and ends on a serious note.
![]() |
काकु नेहा कुलकर्णी गाणं |
Kaku Rap Song Lyrics
नमस्कार...
मी नेहा कुळकर्णी...
नमस्कार...
मी नेहा कुळकर्णी...
समजवायला आले आज या बायकांची कर्णी
बायकांमधील एक स्पेशल ही जात
यांचा एकच काम धंदा दिस आणि रात
हीच काय चाललय तीच काय हाल
रात्री आले लेट यांनी केला बवाल
यांच्या भिंतींना कान
यांच्या खिडक्यांना डोळे
जपून राहायला लागतय
काकूंचा विषय खोलये...
गोळे तिच्या डोक्यात
मनात विचार फालतू
नुसती इकड तिकड नजर
अग समोर बघून चाल तु
न्यूज चॅनलची नाय गरज
हीचा रेडिओ नुसता चालू
स्वतः करते गॉसिप
दुसऱ्यांना म्हणते चालू
हिच्या डोक्याला गजरा
हिच्या गावभर नजरा
हीचा मुखडा तर बघा
कसा लाजरान साजरा
आता बास की काकु
नको बघु वाकू वाकू
घरातून बाहेर आम्ही निघू का नकू
हिचे मोठे मोठे टॉपिकस्
हीची लाल लाल लिपस्टिक
ही करते नटा पता
हिच्या मेकअप किती प्लास्टिक
इलास्टिक हीच तोंड करते
किती बडबड
काम येत नाही सारे
सारी सारी हीची गडबड
काय हीच वागणं काय ह्यांचे संस्कार
काय याचं बोलण काय यांच्या शरीराचा आकार
आमची पिढी चांगली होती
साडी पदर बांगडी होती
संस्कारी साऱ्या मुली
तुमच्या सारखी लफडी नव्हती
हीच तिला तीच हिला
महाभारत राम लीला
एकट्या दुकट्या नसतात ह्या
यांच्या खबरी अख्खा जिल्हा...
तुमची गडबड बडबड किती
चोंबडे पणा हा घरभर किती
नाव ठेवण्यात आयुष्य गेलं
त्याच्यासाठी मरमर किती
आमच्या पावडर च किती वजन
आमचे मित्र की भर डझन
आमचं करिअर किती खराब
तुमची बारकाईने नजर
तुमच्या मुलीचे मित्र मित्र
आणि आमचे मित्र लफडी
तिने केलं तर चालत
आणि आम्ही केलं तर छपरी
आमचे कपडे किती छोटे
तुमचे विचार किती मोठे
काकु.....
तुम्हाला पण Happy women's day...
खऱ्या स्वप्नांना बळ दे
नारीला साथ दे
चालायला वाट दे
जगण्याचा थाट दे
थाट दे...थाट दे...थाट दे...थाट दे...
भारतीय संस्कार माझे
विसरणार मुळीच नाही
आई बापाची इज्जत कधी
मिळवणार धुळीस नाही
जिंकायची मने सारी
काकु आशीर्वाद द्यावा
नारीच्या प्रगतीला या
नारीनेच हात द्यावा...
Kaku Rap Song Credits -
- Singer - Neha Kulkarni
- Lyrics - Kaushiki Chavan
- Music - Dhiraj kate