![]() |
मन हे झुलू लागलं |
Man Zulu Lagal Lyrics Song
नजरेचा इशारा, कळला गं उशिरा.....
देखण्या रूपावरी हे भूलू लागलं......
तुझ्या पिरमामधी पडून हे खूलू लागलं
मन हे झुलू लागलं...
मन हे झुलू लागलं
तुझ्या बोलण्यात अशी जादू लय भारी,
जाईल गुतुन कोनी अशी गं उभारी,
रूपाची खाण तू बी न्हाई कमी पोरी,
भुलवुन साऱ्याला मनाची केली चोरी,
तुझ्या ह्या तोऱ्यानं, गार गार वाऱ्यानं...
कानातलं डुलं तुझं डुलू लागलं...
तुझ्या पिरमामधी पडून हे खूलू लागलं
मन हे झुलू लागलं...
मन हे झुलू लागलं...
सूचंना काही मला दिसता तू समोर,
मनात दिन रात तुझाच इचारं,
हसाया लागल्याती गावातली पोरं,
जुळलया मन आता दे तुझा होकार,
हिरव्या रानात, तुझ्या माझ्या मनात....
पिरतीचं शिवार हे फुलु लागलं....
तुझ्या पिरमामधी पडून हे खूलू लागलं
मन हे झुलू लागलं...
मन हे झुलू लागलं...
Man He Zulu Lagal Song Credits -
- Lyrics : Sandeep Rokade
- Singer : Sandeep Rokade
- Composer : Sandeep Yogesh
- Recorded at : Musical Stars Studio Pune
- Music Arranger : Yogesh Kamble
- Mixing and Mastering : Yogesh Kamble