Type Here to Get Search Results !

Bhagava Fadakala lyrics song - शिवाजी महाराज song

0
Presenting a new Bhagava Fadakala Lyrics Song is Shivjayanti New Song 2021 Bhagava Fadkala marathi Song singer Pankaj D Ghanekar, Prajakta Dhanawade New Marathi shiv jayanti song Bhagava Fadakala song Lyrics Vikas Dhanawade. Aamcha Bhagava Fadakala song is Produced by Maruti Manavar ,Pankaj D Ghanekar

Bhagava Fadakala song
भगवा फडकला

Bhagava Fadakala Song Lyrics -


जय भवानी....
जय शिवाजी....

महाराष्ट्राचा दिन सोन्याचा....
महाराष्ट्राचा दिन सोन्याचा
रवी उदय झाला
शिवनेरीवर ढोल नगाडा चौघडा वाजला
आमचा भगवा फडकला....
हे....
शिवनेरीवर ढोल नगाडा चौघडा वाजला
आमचा भगवा फडकला...

स्वर्णरुपी दिन जाहला
बाळ शिवबा जन्मास आला
रयतेचा वाणी झाला
भवानीचा आशीर्वाद त्याला....२

सह्याद्रीच्या कडेकपारी.....
सह्याद्रीच्या कडेकपारी
नाद दणाणला....२
बघा नाद दणाणला...
शिवनेरीवर ढोल नगाडा चौघडा वाजला
आमचा भगवा फडकला...४

घोड्यावरी होऊनी स्वार
हाती लखलखती तलवार
कधी घेईना माघार
जणू शिवशंभू अवतार...२

जय भवानी....
जय शिवाजी.....
जयघोष हा झाला...२

जयघोष हा झाला...
शिवनेरीवर ढोल नगाडा चौघडा वाजला
आमचा भगवा फडकला...२

ठरला एकच असा हा राजा
होता मर्दानी छातीचा
वाघावानी दरारा त्याचा
थरकाप होई शत्रूचा...२

शिवरायाने पराक्रमाने..... २
महाराष्ट्र घडविला...२
करू मुजरा त्या राजाला....
शिवनेरीवर शिवशाहीचा चौघडा वाजला
आमचा भगवा फडकला...४

महाराष्ट्राचा दिन सोन्याचा....
महाराष्ट्राचा दिन सोन्याचा
रवी उदय झाला...२

शिवनेरीवर ढोल नगाडा चौघडा वाजला
आमचा भगवा फडकला...
हे....
शिवनेरीवर ढोल नगाडा चौघडा वाजला
आमचा भगवा फडकला...


Aamcha Bhagava Fadakala Song Credits-

  • Lyrics - Vikas Dhanawade
  • Singer - Pankaj D Ghanekar, Prajakta Dhanawade

This song is sung by Pankaj D Ghanekar in 2021

  • Produce - Maruti Manavar ,Pankaj D Ghanekar


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या