![]() |
लागीर झालं जी लागीर |
Lagir zhal ji lagir Song lyrics -
कावऱ्या बावऱ्या मनात वादळ उठले
साजिरे गोजीरे निनाद काहूर कसले -२
आता तरी सांगना ठाव मनीचा तुझ्या
कळू दे जरा मला डाव कोणी साधिला
डोळ्यातले भाव राहिले मुके
लागीर झालं जी लागीर,
भारल इश्कान भारलं -२
नाद काळजाचा का वेड लावी जीवा
रोजचा गारवा का आज वाटे नवा -२
उन्ह सावलीचे खेळ हे,
भास चाहुलीचे मेळ हे
जुळतील ही खुलतील ही या रेशमाचे धागे
आता तरी सांगना ठाव मनीचा तुझ्या
कळू दे जरा मला डाव कोणी साधिला
डोळ्यातले भाव राहिले मुके,
लागीर झालं जी लागीर,
भारल इश्कान भारलं -२
तुझे लाजने जणू चांदणे नभा आड लपती सये -२
तुझे हासने जणू काजवे आसमंत उजळी दिवे
तुझ्या चाहुली लळा लावती,
नैन बावरे तुला शोधती
दिशाहीन ही जरी वाट ती
तरी चाललो मी तुझ्या सोबती
Lagir zhal ji lagir Song Credits -
- Singer: Vicky Wagh
- Lyrics: Vicky Wagh
- Music : Vicky-Mohit
- Music Production: Darshan Sutar
- Additional Music Production: Mohit Kulkarni
This song is sung by Vicky Wagh in 2021
- Flute: Pramod Umpathi
- Guitars : Mohit Kulkarni
- Shehnai : Rajendra G Salunke
- Percussions : Shubham Salokhe