![]() |
मखमली मखमली |
Makhmalee Lyrics Song
अलगद उडते वाऱ्यावर ओढणी
खुदकन हसते औखळ साजणी...
हळू हळू खुलते या गालावरची खळी
ओठावर जणु ही गोड गोड पाकळी...
तु भरजरी स्वप्नांची सावली...
मखमली मखमली....
तु गंध तो दरवळे भोवती...
सुंदरी सुंदरी...
आस तू...आभास तू...
माझ्या मनाची आस तू...
नसले जरी हे जग तरी...
माझा सुरीला श्वास तू...
आकाशाच्या ओठावर जस हसू खेळकर
मोरपंखी तशी तुझी मऊ मऊ ही नजर
आता झालं खुल सार मनाच हे बंद दार
सावरून घेतलस मन वेड अलूवार
तु भरजरी स्वप्नांची सावली...
मखमली मखमली....
तु गंध तो दरवळे भोवती...
सुंदरी सुंदरी...
चंचल कधी गंभीर तु...
मादक जणू तस्वीर तु...
जडली जशी माझ्यावरी...
मोहक जणू जंजीर तु...
आस तू...आभास तू... आभास तू...
माझ्या मनाची आस तू... आस तू...
नसले जरी हे जग तरी... जग तरी...
माझा सुरीला श्वास तू... श्वास तू...
Makhmalee Marathi Song Credits
- Movie - Avwanchhit
- Singers - Avadhoot Gupte & Anupam Roy
- Music - Anupam Roy
- Lyricist - Omkar Kulkarni