![]() |
विठ्ठल विठ्ठल जय हरी Marathi Song 2023 |
Vithal Vithal Jay Hari Song Lyrics In Marathi
गंध लावुनीया भाळी
धरणी विष्णुमय झाली...
भगवा पताका घेऊनी
वारी निघाली निघाली...
ओ वारी निघाली निघाली...
रंग तुळशीचा गहिरा, राम कृष्ण नि सावळा
पंढरीत नांदे बाई माझा, हरी सावळा...
वैष्णव ल्याले टाळ वीणा, हाती वाजे मंजिरी
जयघोष विठ्ठलाचा नादे ऊभी पंढरी...
घुमला गजर आभाळी,विठ्ठल विठ्ठल जय हरी
विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी..!!ध्रु!!
विठू तुझ्या पायीची, वीट मज होऊ दे
आस नाही चंदनाची, तीट मज होऊ दे...
मुर्त डोळा साठवुणी, दृष्ट तुझी काढीनं
सख्या संगतीने राया वैकुंठ मी पाहीनं... वैकुंठ मी पाहीनं
घे कुशीत तुझिया माऊली,विठ्ठल विठ्ठल जय हरी
विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी.. !!१!!
वाळवंटी चंद्रभागा, वाट पाहे गणगोताची
आस लागे मायबाप, विठ्ठलाच्या दर्शनाची
वाळवंटी चंद्रभागा, वाट पाहे गणगोताची
आस लागे मायबाप, विठ्ठलाच्या दर्शनाची
सुंदर ते ध्यान ,उभे विटेवरी
तुळशीहार गळा कंठी, कौस्तुभमणी
झाली विष्णुमय पंढरी ,विठ्ठल विठ्ठल जय हरी
विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी... !!२!!
जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी
Jay Hari Lyrics Song Credits
- Singers : Manish Rajgire & Anuja Deore
- Music Director : Prasad Shirsath
- Lyrics: Smita Kulkarni & Prasad Shirsath
This song is sung by Anuja Deore Song in 2023
- Music Label : Jagdamba Productions
- 𝐒𝐭𝐚𝐫𝐫𝐢𝐧𝐠: Rushi Kanekar & Anushri Mane
- Director : Swapnil patil